भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्णपणे उघडले आहे. सध्या हतनूर धरणातून 30 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. विदर्भ, काही मध्य प्रदेशात पाऊस होत असल्याने हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे त्यामुळे हे दरवाजे उघडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.