पुणे : शिरूर तालुक्यातील वाघाळे गावातील भोसले वस्ती परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी शेत शिवारात तसेच लोक वस्तीच्या जवळ बिबट्या दिसल्याचे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे बिबट्या ला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.