जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा शिवारातील एका मक्याच्या शेतात बिबट्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने सोमवारी ही माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र बिबट्याला तात्काळ पकडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत वन कर्मचाऱ्यांना घेराव घातला.