वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया पिकाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात चियाच्या बाजारभावात सुमारे १,५०० रुपयांची घट नोंदविण्यात आली असून, यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.