वाशिम जिल्ह्यात लग्नसराई आणि धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या दरात मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम आता हार, गाडी आणि मंडप सजावटीवरही दिसून येत आहे. गुलाब, मोगरा, काकडा आणि शेवंती या फुलांच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत.