बिहार आजही बिमारू राज्याच्या शिक्क्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकलेला नाही. कमी साक्षरता, प्रचंड गरिबी, उद्योगांचा अभाव आणि कमी दरडोई उत्पन्न ही बिहारची प्रमुख आव्हाने आहेत. शहरीकरणाच्या बाबतीतही हे राज्य मागे आहे. लाखो कुशल तरुणांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते, तर शिक्षण व्यवस्थेची बिकट अवस्था भविष्यासाठी मोठे संकट ठरत आहे.