सुधीर मुनगंटीवार यांनी बिहार निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. जयप्रकाश नारायणजींची भूमी आणि नालंदा विद्यापीठाचा वारसा लाभलेल्या बिहारमध्ये आजही दारिद्र्य देशाच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. यामुळे बिहारी जनतेत नाराजी होती. या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला लोकांनी योग्य कौल दिला, असे मुनगंटीवार म्हणाले.