वैशाली येथे चोरट्याच्या घरातून जप्त केलेले सोने आणि मोठी रोकड पोलिसांनीच गायब केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ३० डिसेंबर रोजी लालगंज पोलीस स्टेशनच्या पथकाने छापा टाकत सोने, पैसे आणि रिव्हॉल्व्हर जप्त केले होते. या प्रकरणात एसएचओ आणि एका उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू आहे.