नंदूरबारमधील नवापूर इथल्या पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने एक लाख चाळीस हजार कोंबड्या मारल्या जाणार आहेत. तीन पोल्ट्री फार्मचे सॅम्पल इंदूरच्या प्रयोगशाळात पाठवले होते, त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एक तालुकास्तरीय समिती तयार करण्यात आली असून नवापूरच्या परिसरातील सर्व पोल्ट्री फार्मचे आता सॅम्पल्स घेतले जाणार आहेत.