नंदूरबारमधील नवापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यामुळे दोन दिवसांत 44 हजार पक्षी नष्ट करण्यात आले. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसतोय. सात पोल्ट्री फार्ममधील सुमारे 1.40 लाख पक्षी नष्ट करण्याचं नियोजन आहे. यासाठी 50 हून अधिक कर्मचाऱ्यांचं पथक युद्धपातळीवर कार्यरत आहे. संसर्ग रोखण्यासाठी चिकन, मटण आणि अंडी विक्रीची दुकानं बंद आहेत.