मार्च ते जून... हा काळ निसर्गप्रेमींसाठी आणि पक्षी जगतासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. सध्या धुळे शहरासह जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढत असला, तरी पक्षांच्या दुनियेत मात्र विणीच्या हंगामाची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यात पक्षांच्या हालचाली शिगेला पोहोचतात.