रत्नागिरी शहरात गवा रेड्याची दहशत निर्माण झाली आहे. शहराजवळच्या भाट्ये सागरी महामार्गावर गवा रेडा आल्याने त्याच्या मागे भटके कुत्रे लागले. गवा रेड्याने शांतपणे रस्ता ओलांडून भाट्ये गावाच्या जंगलात धूम ठोकली. रस्त्यावर गवा आल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. वन विभागाच्या माध्यमातून गवा रेड्याचा शोध सुरु आहे.