चंद्रपूरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचार सभेत भाजप बंडखोर मनोज पोतराजे यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवून हुसकावून लावले. मनोज पोतराजे यांच्या पत्नी पूजा पोतराजे यांना भाजपची उमेदवारी नाकारल्याने त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. हा प्रकार भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि उमेदवारी वादाचे ज्वलंत उदाहरण आहे.