पंतप्रधान मोदींनी अलीकडील महापौर आणि नगरसेवक निवडणुकीच्या निकालांवर भाष्य केले. भाजप महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नंबर एकचा पक्ष बनला आहे, असे त्यांनी सांगितले. एकूण २९ पैकी २५ मोठ्या शहरांमध्ये भाजप-एनडीएला जनतेने निवडले असून, ५० टक्के नगरसेवक भाजपचे आहेत, हे अभूतपूर्व यश आहे.