पुण्यात आज भाजपची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या ठिकाणाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभीजी भिडे हे उभे होते. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे बैठकीसाठी आत चालले होते. मात्र आता जाताना त्यांनी संभाजी भिडे यांच्याकडे दुर्लक्ष केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.