गणेशोत्सव म्हटलं की तो चिमुकल्यांसाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि थिरकण्याचा खास सोहळाच असतो. जळगाव जामोद शहरातील विविध गणेश विसर्जन मिरवणुकांना भेटी देत असताना, चिमुकल्यांच्या आग्रहास्तव जळगाव जामोद मतदार संघाचे भाजपा आमदार डॉ. संजय कुटे हे त्यांच्या तालावर चिमुकल्यासोबत मनसोक्त थिरकले आणि त्यांच्या निरागस आनंदात सहभागी होऊन तो क्षण द्विगुणित केला.