आनंद, उत्साह आणि खिलाडू वृत्तीचे प्रतीक म्हणजे फुगडी. हे विश्व जणू शिवशक्तीची फुगडीच आहे असे संत तुकोबाराय म्हणतात. चिखली मतदारसंघातील मौजे म्हसला बु. येथील आळंदी ते पंढरपूर दिंडीला फलटण येथे भाजप आमदार श्वेता महाले यांनी भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. तसेच वारकरी माऊली व श्री विद्याधरजी महाले यांचेसोबत फुगडी खेळण्याचा आनंदही घेतला.