जितेंद्र आव्हाड विसरून गेले आहेत का की ते देखील हिंदू आहेत. ते सातत्याने हिंदू असून हिंदू धर्मावर टीका करत असतात. सगळे नालायक हिंदू धर्मातच तयार होतात, असं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. तसेच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना जितेंद्र आव्हाड यांची ही भूमिका मान्य आहे का? असा प्रश्नही विचारला. नितेश राणे अमरावतीत बोलत होते.