सोलापूर मध्ये झालेली अतिवृष्टी ही नैसर्गिक नसून सरकारनिर्मित असल्याची टीका काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केली होती. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल प्रत्युत्तर देत टीका केली होती. तसेच मुख्यमंत्र्यांनी संबंधित लोकप्रतिनिधींना एक फुल देत गेट वेल सून म्हणा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यानंतर सोलापूर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रणिती शिंदे सोलापुरात नसल्याने त्यांच्या प्रतिमेला कमळाचे फुल देत आंदोलन केले.