महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षाची तुलना टीपू सुलतान यांच्याशी केल्याच्या विधानाच्या निषेधार्थ वाशिममध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील पाटणी चौकात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.