बिहार निवडणुकीत NDA ला मिळालेल्या विजयाबद्दल नागपुरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. भारत माता चौकात फटाके फोडून भारत मातेला पुष्पहार अर्पण करून जल्लोष साजरा केला. बिहार मधील जनतेने भाजपला भरभरून मतदान केल्याबद्दल बिहारच्या जनतेचे आभार मानले.