आखाती देशात सध्या युद्धामुळे तणावाची स्थिती आहे, याचा परिणाम हा गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर झाला असून, सध्या अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान त्यामुळे मोठ्या प्रमाणात काळाबाजार देखील होत आहे. आज पोलिसांनी ठाण्यातील कापूरबावडी परिसरात एका गोदामावर छापा टाकला आहे. इथे मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.