अहिल्यानगर जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशी सर्वदूर दाट धुक्याची चादर पसरली होती....कालपासून वातावरणात गारवा निर्माण झाला असून थंडी देखील जाणवू लागली आहे... कोपरगाव तसेच लोणी परिसरातील धुक्याची ही दृष्यं आहेत.रस्त्यांवर काही फुटांपुढेही दृश्यता कमी झाल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागली... हवेत गारठा जाणवत असून, पिकांवरही दवबिंदूंचा थर दिसून येत आहे...गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतानाच आता थंडीच्या आगमनाने रब्बी हंगामाच्या सुरुवातीची चाहूल लागली आहे. धान्य, गहू आणि हरभरा पिकांसाठी ही थंडी अनुकूल असली तरी भाजीपाला पिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.