आज मनसेचे प्रमुख नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर बंद लिफाफे घेऊन शिवतीर्थवर दाखल झाले होते. इच्छुक उमेदवारांना उद्यापासून AB फॉर्म देणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सही केलेले फॉर्म बंद लिफाफ्यातून घेऊन मनसेचे नेते शिवतीर्थ वर दाखल झाले होते. त्यानंतर या नेत्यांची राज ठाकरेंसोबत बैठक झाल्याचीही माहिती समोर आली आहे.