मुंबई महानगरपालिका आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईत 23 ठिकाणी, तर कल्याण-डोंबिवलीमध्ये आठ प्रभागांमध्ये उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. टीव्ही नाईन मराठीवर या महापालिका निवडणुकांचे वेगवान निकाल पाहता येतील. थोड्याच वेळात मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असून, महाराष्ट्राचे लक्ष या निकालांकडे लागले आहे.