दहिसर येथील वॉर्ड क्रमांक 1 मधून शिवसेना (ठाकरे गट) कडून फोरम जितेंद्र परमार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने समर्थक, शिवसैनिक तसेच मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर हे देखील त्यांच्या सोबत होते. अर्ज दाखल केल्यानंतर परिसरात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी उत्साह व्यक्त केला.