मुंबई महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून मुंबईतील 12 विभागांमध्ये 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. शहरातील रहिवाशांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मुंबईच्या अनेक भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.