रायगड जिल्ह्यातील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या जंजिरा किल्ला येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या सुरक्षित जेट्टीमुळे आता वाद निर्माण झाला आहे. पुरातत्त्व विभागाने शनिवारी सकाळी किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यानंतर राजपुरी येथील शिडाच्या बोटधारकांनी संतप्त होत बोटी बंद ठेवल्या आणि संप पुकारला. यामुळे किल्ला पाहण्यासाठी आलेल्या शेकडो पर्यटकांचे मोठे हाल झाले.