दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात पार पडलेल्या पारंपरिक होड्यांच्या शर्यतीने सांगलीकरांची मने जिंकली.सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दहा हून अधिक संघांनी या स्पर्धेत सहभाग घेत प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाला छेद देत आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले.भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णाराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ झाला.