गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान येथे जलाशयातून नौका विहाराचा शुभारंभ करण्यात आला.... राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते रिबीन कापून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.... शुभारंभानंतर खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजकुमार बडोले यांनी स्वतः नौका विहाराचा आनंद घेतला. पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला असून यामुळे पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे....