हिंजवडी फेज 1 मधील एका नामांकित इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. शाळेच्या ई-मेलवर धमकीचा मेल आल्यानंतर शाळा प्रशासनाने तात्काळ पिंपरी चिंचवड पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पिंपरी चिंचवड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शाळेत कसून तपासणी सुरू केली.