अकोला पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार व बोरगाव ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलिस स्टेशनतर्फे रूट मार्च काढण्यात आला आहे. तर गणेशोत्सव तसेच आगामी विविध सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि शांततेत उत्सव पार पडावेत या उद्देशाने हा रूट मार्च काढण्यात आला.