बागलाण तालुक्यातील कंधाने गावात एका शेतकऱ्याने बंद केलेला शिवाररस्ता अखेर गावातील महिलांनी स्वतःच्या मेहनतीने मोकळा केला आहे. ग्रामपंचायतीपासून तहसीलदारांपर्यंत अनेकदा पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने महिलांनी एकत्र येत झाडे-झुडपे हटवून रस्ता खुला केला.