डॉ. रोहित कपूर स्पष्ट करतात की, प्रक्रिया केलेले मांस, लाल मांस आणि तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो, विशेषतः जर BRCA1, BRCA2 सारखी जनुके उपस्थित असतील. फळे आणि भाज्या संरक्षणात्मक असतात, तर चिकन आणि मासे तटस्थ मानले जातात. शाकाहारामुळे पूर्ण संरक्षण मिळत नाही, कारण जनुकेही महत्त्वाचे घटक आहेत.