ग्रामीण भागातील लग्न म्हटलं की लाजरी नवरी असेच काहीसे चित्र असते,पण स्वतःच्या लग्नात पोवाडा गाणारी नवरी यापूर्वी ग्रामीण भागात कधी पाहायला मिळाली नव्हती,पण परभणीच्या पिंपळगाव सय्यद मीय्या येथील देविदासराव मोरे यांची कन्या राधा हिचा विवाह जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील सावरखेडा येथील गोपाळराव वावळ यांचे चिरंजीव योगेश यांच्याबरोबर पार पडला. यावेळी वधु राधा हिने लग्नापूर्वी छत्रपती शिवरायांच्या प्रतीमेचे पूजन केल्यानंतर पोवाडा गात सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला,राधाच्या शिवप्रेमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.