मुरबाड तालुक्यातील नांदगाव फाटा म्हिले रस्त्यावरील ठुणे गावाजवळील पूल रात्री तीन वाजताच्या सुमारास कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही, 1984 साली हा पूल बांधण्यात आला होता. हा पूल कोसळल्याने 10 ते 12 गावांतील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.