मुंबईतील अंधेरी परिसरात एका मुक्या श्वानाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 'मायकी' नावाच्या या श्वानाच्या हत्येनंतर प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, बॉलिवूड अभिनेत्री मंजिरी फडणीस यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.