भुसावळ मधील शहरातील एसटी बसस्थानकाच्या आवारातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवासी, बस चालक आणि नागरिक त्रस्त झाले असून, दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेले डांबरीकरणाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने नाराजी वाढली आहे.