अर्थसंकल्प 2026 मध्ये इन्कम टॅक्समध्ये मोठ्या सुधारणांची शक्यता वर्तवली जात आहे. मागील वेळी सरकारने ₹12.75 लाखांपर्यंतची कर सवलत दिली होती. आता निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील सरकार इन्कम टॅक्समध्ये आणखी कोणते बदल आणू शकते, यावर बँकिंग तज्ज्ञ अश्विनी राणा यांनी प्रकाश टाकला. नोकरदार वर्गासाठी या सुधारणा महत्त्वाच्या ठरू शकतात.