कल्याण पश्चिमेतील घोलप नगर परिसरात रविवारी दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी री-डेव्हलपमेंटसाठी पाडकाम सुरू असलेल्या विनायक दर्शन इमारतीचा मोठा भाग अचानक भर रस्त्यात कोसळला. इमारत कोसळतानाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाडकामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षणात्मक उपाययोजना नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यावेळी इमारतीच्या शेजारी राहणाऱ्या मोरे कुटुंबाने धोका ओळखून किचनच्या खिडकीतून उडी मारत जीव वाचवला, यामध्ये त्यांच्या घराचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले.