भारतीय रेल्वेने या वर्षाच्या अखेरीस देशातील ७५ सर्वात वर्दळीच्या स्थानकांवर किमान १०० फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील संत नगरी शेगाव येथील रेल्वे स्थानकावर नुकताच ३० बाय २० फूट रुंदीचा राष्ट्रध्वज सन्मानाने फडकवण्यात आला. राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर राष्ट्रगीताने ध्वजाला सलामी देण्यात आली.