प्रवाशांना सुरक्षित आणि प्रदुषणमुक्त प्रवासाची सुविधा मिळावी.यासाठी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली.मात्र,खामगांव आगाराच्या शिवाई बसमध्ये खामगांव ते मेहकर मार्गावर (बस क्रमांक एमएच ४९ सी डब्ल्यू १४५७ ) धावणाऱ्या इलेक्ट्रिक बसमध्ये चालकच मोबाईलवर खेळत बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चालकाच्या हातात मोबाईल आणि दुसऱ्या बाजूला बसचे स्टेअरिंग अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .हा संपूर्ण प्रकार बसमधील एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला आहे.परिवहन विभागाने गांभीर्याने दखल घेऊन चालकावर कारवाई करावी आणि बस चालकांना वाहन चालवताना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.