बुलढाणा जिल्ह्यातील मानेगावात शेतातील विहिरीत पडलेल्या काळवीटाची ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप सुटका झाली. वन विभागाला कळवूनही वाहनांच्या अनुपलब्धतेमुळे दोन तास उशीर झाल्याने नागरिकांत तीव्र रोष आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेत असलेल्या नागरिकांनी वन विभागाला पुरेसे मनुष्यबळ व साधनसामग्री उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.