बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील गुंजाळा गावाजवळ असलेल्या पाझर तलाव क्र. २ च्या भिंतीला साळींदर प्राण्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पाडल्याने तलावाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या बोगद्यांमधून पाणी झिरपू लागल्यास भिंतीची मजबुती कमी होऊन ती फुटण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने परिसरातील शेतकरी भीतीच्या छायेत आहेत.