बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये आज भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. श्री संत गजानन महाराजांची पालखी आज शेगाव येथे पोहोचणार असून, पालखीच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाविक शेगावमध्ये दाखल झाले आहेत. पालखीसोबत येणाऱ्या लाखो भाविकांमुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.