बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे नदी- नाले आणि शेतजमिनीतील गाळयुक्त पाणी थेट मुख्य धरणाच्या जलाशयात मिसळले आहे.. यामुळे कच्च्या पाण्याचा गढूळपणा कमालीचा वाढला असून, शहरात नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा रंग बदलल्याचे समोर आले आहे. या पाण्यात शास्त्रीय प्रक्रिया सुरू असून पाणी निर्जंतुक करण्याचे काम सुरू आहे. असं असलं तरीही नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.