मागील आठवडयापासून जिल्ह्यात इंधन टंचाई भासत आहे. ज्या पंपावर इंधन उपलब्ध आहे, त्याठिकाणी वाहनाच्या रांगा आहेत. बुलढाणा ते चिखली मार्गांवरील पंपावर रात्रीपासून वाहनाच्या रांगा लागल्या आहे . तब्बल 12 तासांपेक्षा जास्त वेळापासून ट्रॅक्टर आणि इतर वाहने रांगेत उभी आहेत .