बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसांपासून प्रचंड उष्णतेची लाट सुरू आहे. काल रविवारी मलकापूर येथील चौथीच्या विद्यार्थ्यांची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा तब्बल 43 अंश तापमानात तेही तीनपत्र्याच्या खोलीत घेण्यात आली. भर दुपारी लहान विद्यार्थ्यांना टीनपत्र्याच्या उष्ण खोलीत बसवण्यात आल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.