बुलढाणा : डोणगाव शहरात आज सकल शिवप्रेमी समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. चिखला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादाच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता.