बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात जळालेले रोहित्र त्वरित बसवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी युवासेनेच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात आंदोलन केले. पिके सुकत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे निवेदन स्वीकारले न गेल्याने त्यांनी रिकाम्या खुर्चीवर सुक्या ज्वारीचे धांडे ठेवून निषेध नोंदवला. महावितरणच्या दुर्लक्षाविरोधात हा रोष व्यक्त झाला.